Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

सौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा स्वराज

पोटाची खळगी भरण्यासाठी मायदेशातून सौदीला गेलेले हजारो भारतीय सध्या संकटात सापडले आहेत. सौदीमधील  भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्यानंतर आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  भारतीयांना मायदेशी परतण्यामध्ये  अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची भारत सरकारने गांभिर्याने दखल घेतली असून सौदीत अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणू, असे आश्वासन
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी राज्यसभेत दिले. सौदीतून  भारतीय कर्मचाऱ्यांची सुटाका करण्याच्या मोहिमेअंतर्गत परराष्ट्र  राज्यमंत्री व्ही के सिंह यांना सौदीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुषमा यांनी दिली आहे. सौदीमध्ये अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. भारतीयांच्या या हाकेला साद देत सुषमा यांनी परदेशातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी झटपट पाऊले उचलत सर्व प्रथम त्यांच्यासमोरील उपासमारीची समस्या दुर करण्यासाठी  तात्काळ धान्य पुरविण्याचे आदेश दिले होते. या  भारतीय नागरिकांना अन्न-धान्य पोहचवल्याची माहिती देखील सुषमा यांनी सभागृहात दिली.  भारतीय ज्या कंपनीमध्ये काम करत होते, त्या कंपन्या बंद पडल्या असून सौदीतील कायद्यानुसार, कंपनीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय त्यांना मायदेशी परतता येणार नसल्याची तरतुदीमुळे भारतीय कर्मचाऱ्यांना मायदेशी परतण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या दुर करण्यासाठी भारत सरकार सौदी सरकारशी विशेष करार करणार असून या कराराच्या मदतीने भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात येणार आहे. सौदीमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकित आहे. त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी देखील भारत सरकार प्रयत्नशील असेल, असे स्वराज यांनी सांगितले.

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email