Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

चौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा

कोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील मुलास कामाला ठेवल्यास मालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याची तरतूद असलेले विधेयक मंगळवारी संसदेत मंजूर करण्यात आले. मात्र १४ वर्षांखालील जे मूल कुटुंबीयांना मदत करते त्याला यामधून वगळण्यात आले आहे. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयकात १४ वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे हा मालकांसाठी दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला
आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची व्याख्या किशोरवयीन वर्गवारीतील, अशी करण्यात आली आहे, त्यांना धोकादायक व्यवसायात कामाला ठेवता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email