Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

भारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार


सुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील
कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपल्या गायनामधून सामाजिक सलोखा जपला आहे. कृष्णा यांनी भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या गायनामधून करून देत, दलित व इतर वर्गाच्या समुदायाला संगीताची ओळख करुन दिली. तर बेझवाडा विल्सन यांना मानवी प्रतिष्ठेच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ते लढत आहेत. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार १९५७ पासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, सामाजिक कार्यकर्त्यां अरूणा रॉय यांच्यासह काही भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.

4 comments:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email