Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

पाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन


प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचा ८ गुणांनी धुव्वा उडवून पाटणा पायरेट्सचा संघ दुसऱयांदा विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पाटणा पायरेट्सने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत जयपूरची यशस्वी ‘पकड’ केली. पाटणाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला. प्रदीपने चढाईत एकूण १६ गुणांची कमाई करून
संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जयपूरचा बचाव यावेळी पूर्णपणे ठासळलेला पाहायला मिळाला. प्रदीपने याचाच फायदा उचलून गुणांची कमाई केली. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पाटणाकडे फक्त तीन गुणांची आघाडी होती. त्यामुळे जयपूरकडे पुनरागमनाची चांगली संधी होती. मात्र, पाटणाने अखेरच्या सत्रात देखील आपले वर्चस्व कायम राखत जयपूरला ऑल आऊटकरून दमदार आघाडी प्राप्त केली. त्यानंतर जयपूरला संधीच मिळाली नाही. प्रदीप नरवालने एकामागोमाग एक यशस्वी चढाया करीत संघाला विजय मिळवून दिला. पाटणाने जयपूरवर ३७-२९ असा विजय प्राप्त केला. याविजयासह पाटणा पायरेट्सचा संघ सलग दुसऱयांदा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
दुसरीकडे तिसऱया स्थानासाठीच्या लढतीत पुण्याने तेलगू टायटन्सवर मात केली आहे, तर महिलांच्या प्रायोगिक स्वरूपातील तिरंगी स्पर्धेत तेजस्विनी बाईच्या नेतृत्वाखालील स्टॉर्म क्वीन्सने ममता पुजारीच्या नेतृत्वाखालील फायर बर्ड्सवर संघावर रोमांचक विजय प्राप्त केला. स्टॉर्म क्वीन्सने केवळ एका गुणाने विजय प्राप्त केला.

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email