Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

दारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबंदीसाठी नितीश कुमारांचा नवा कायदा


बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारकडून दारूबंदीचा कायदा अधिक कडक करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार एखादी व्यक्ती दारू पिताना, दारूचा साठा किंवा विक्री करताना आढळल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही शिक्षा करण्यात येईल. तसेच दोषी व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचे आणि संपूर्ण गावावर किंवा शहरावर सामूहिक दंड लादण्याची तरतूदही या कायद्यात आहे.
याशिवाय, याप्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीला जामीनही मिळू शकणार नाही.
बंदीची नशा 
नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यानंतर संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू केली होती. याअंतर्गत राज्यात देशी बनावटीच्या परदेशी दारूसह सर्व प्रकारच्या दारूच्या सेवनावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, मित्रपक्ष असलेल्या राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ताडीवर बंदीला त्या व्यवसायातील लोकांची रोजीरोटी जाईल असे सांगून विरोध केला होता. त्यामुळे १९९१ च्या कायद्यानुसार वैयक्तिक सेवनासाठी ताडीला बंदीतून वगळण्यात आले आहे.
नितीशकुमार यांचे राष्ट्रीय प्रतिमावर्धन! 
बिहारच्या २०१६च्या अबकारी कायद्यातील सुधारणा शुक्रवारी विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. मात्र, भाजपकडून हा कायदा खूपच कठोर आणि विजोड असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. दारूबंदीला आमचा पाठिंबा आहे. मात्र, नवा कायदा खूपच कठोर आहे. एखाद्याच्या चुकीसाठी आपण त्याच्या कुटुंबाला कसे जबाबदार धरू शकतो? तुम्ही खुनी आणि बलात्कारांच्या कुटुंबालाही अटक करणार का?, असा सवाल यावेळी भाजप नेते सुशील मोदी यांनी उपस्थित केला. गुन्ह्याच्यादृष्टीने शिक्षांचे स्वरूप खूपच विजोड आहे. हा म्हणजे तुघलकी कायदा असल्याची टीकाही सुशील मोदी यांनी केली.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email