Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

पेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी


काश्मीरमध्ये अलीकडे म्हणजे गेल्या पंधरा ते सोळा दिवसात उसळलेला हिंसाचार आटोक्यात आणताना सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशनने केली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली असून त्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळताना या गनचा वापर बंद करण्याचे आदेश द्यावेत,
अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बार असोसिशनने याचिकेत म्हटले आहे की, जमावाच्या नियंत्रणासाठी पेलेट गनचा वापर बंद करण्यात यावा कारण त्यामुळे अनेक युवक जखमी झाले आहेत. सोमवारीच याचिकेवर सुनावणी करू मुख्य न्यायाधीशांनी तातडीने आदेश जारी करावेत. वकिलांच्या संघटनेने अशी मागणी केली की, ८ जुलैला बुरहान वनी हा चकमकीत मारला गेल्यानंतर पेलेट गनचा सुरक्षा दलांनी मोठय़ा प्रमाणावर वापर केला असून संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी पेलेट गन वापराचा निर्णय घेतला त्यांच्यावर खटले भरून त्यांना शिक्षा करण्यात यावी. पेलेट गन्सच्या वापराने जे जखमी झाले आहेत त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. जखमींवर राज्याबाहेरील चांगल्या डॉक्टरांकडून राज्य सरकारच्या खर्चाने उपचार करण्यात यावेत.
बार असोसिएशनच्या मते उच्च न्यायालयाने त्यांचा अधिकार वापरून लोकांच्या हिताचे संरक्षण करून राज्यातील लोकांना सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून द्यावे व त्यांच्या हक्कांचेही रक्षण करावे.

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email