Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

बॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

गेल्या दशकभराहून अधिक काळ जर्मनीच्या संघाचा आधारस्तंभ आणि संस्मरणीय विजयांचा शिल्पकार बॅस्टिअन श्वेईनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ट्विटरच्या माध्यमातून बॅस्टिअनने ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच युरो चषकातील फ्रान्सविरुद्धची लढत बॅस्टिअनची जर्मनीचे प्रतिनिधित्त्व करतानाची शेवटची लढत. ३१ वर्षीय बॅस्टिअनने १२० सामन्यांत जर्मनीचे 
प्रतिनिधित्त्व केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत असताना बॅस्टिअन मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळत राहणार आहे. मात्र युनायटेड व्यवस्थापनाने हंगामाअखेर मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये बॅस्टिअनचा समावेश आहे. युनायटेड आणि बॅस्टिअन यांच्यातील कराराची दोन वर्षे बाकी आहेत. मार्च महिन्यात उद्भवलेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बॅस्टिअनचा राष्ट्रीय संघातील सहभाग कमी झाला. युरो चषकात पुनरागमन करताना युक्रेनविरुद्धच्या लढतीत बॅस्टिअनने गोल केला होता. ब्राझीलमधील रिओ येथे झालेल्या २०१४ विश्वचषकात अर्जेटिनाविरुद्धच्या लढतीत बॅस्टिअनने केलेला गोल निर्णायक ठरला होता. अर्जेटिनाने बॅस्टिअनला लक्ष्य केले. त्यांना कडवी टक्कर देत बॅस्टिअनने जर्मनीचा गड सांभाळला.
चेंडू टॅकल करण्याची अनोखी शैली, चेंडू सोपवण्याची सुरेख पद्धत, चिवटपणे झुंज देण्याची वृत्ती यासाठी बॅस्टिअन ओळखला जातो.
संघनिवडीत माझ्या निवडीचा विचार होऊ नये असे राष्ट्रीय प्रशिक्षक जोअ‍ॅकिम लो यांना सांगितले. कारकीर्दीत पाठिंबा देणारे चाहते, संघ, जर्मनी फुटबॉल संघटना आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो. १२० लढतींमध्ये जर्मनीचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. याच संधीदरम्यान आयुष्यातील चिरंतन आणि मौलिक आठवणींचा ठेवा मिळाला. चाहत्यांसाठी देशाचे प्रतिनिधित्त्व करायला मिळाले हा माझा सन्मान आहे. २०१४ विश्वचषक विजय कारकीर्दीतील ऐतिहासिक आणि भावुक क्षण आहे

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email