Pages

Follow by Email

Monday, 1 August 2016

राष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना मृत्यू


राष्ट्रीय स्तरावरील २० वर्षीय क्रीडापटू पूजा कुमारी हिचा शनिवारी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भोपाल येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सेंटर येथे ती सेल्फी काढत होती. त्याचवेळी सेल्फी काढण्याच्या नादात तिचा पाय निसटला आणि ती मत्स्यपालनाच्या तलावात जाऊन पडली. यात तिचा मृत्यू झाला. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अडथळा शर्यत (हर्डल रेस) क्रीडापटू असलेली पूजा कुमारी ही अन्य दोघींसोबत
तलावाच्या जवळ गेली होती. जिथे ही दुर्घटना घडली. शनिवारी सरावावरून घरी परतताना पूजा माश्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी तलावाजवळ गेली होती. याचदरम्यान तिचा पाय घसरला. हा तलाव  स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरच्या (SAI) क्रिकेट मैदानाच्या पाठीमागेच आहे. क्रीडा अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाला पोहता येत नव्हते. त्यामुळे ती स्वतःचा बचाव करता आला नाही.
अधिकारी म्हणाले की, पूजाला पोहता येत नव्हते त्यामुळे तिने मदतीसाठी आवाज दिला. तिच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांनी वसतिगृहाकडे मदतीसाठी धाव घेतली. पण जोपर्यंत त्या मदत घेऊन आल्या तोपर्यंत पूजाचा मृत्यू झाला होता. मुळची उत्तराखंडची असलेली पूजा गेल्या तीन वर्षांपासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरमध्ये स्टीपल चेजचे प्रशिक्षण घेत होती. गेल्याच वर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धेत २००० मीटर स्टीपल चेज स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.

1 comment:


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email