Pages

Follow by Email

Friday, 10 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-10-06-2016-www.KICAonline.com-Marathi


१ कोटी रुपये व सन्मानचिन्ह प्रदान; पुरस्काराची रक्कम संस्थेला अर्पण रोटरी इंटरनॅशनल या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा द वन इंटरनॅशनल हय़ुमॅनेट्रियनपुरस्कार नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे यांना मिळाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख अमेरिकन दीड लाख डॉलर (सुमारे १ कोटी ५ लाख रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. धामणे यांनी या पुरस्कारासह ही

अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांना किरगिस्तानमधील ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक कामगिरी पाहून किरगिस्तानमधील ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्कारासाठी

फ्रान्स-रोमानिया यांच्यात उद्घाटनीय सामना युरोपियन फुटबॉल महासंघाच्या वतीने (युएफा) घेण्यात येणाऱ्या युरोपियन अजिंक्यपद अर्थात युरो चषक फुटबॉल स्पध्रेला शुक्रवारी मध्यरात्री सुरुवात होत आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट, कामगार कायद्यातील बदलाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आणि नैसर्गिक आपत्ती या आव्हानांवर मात करून जगाला एकजुटीचा संदेश देण्यासाठी युरोपातील अव्वल २४ संघ एकवटले आहेत.

पाकिस्तानातील रेल्वेच्या जाळ्याचा दर्जा वाढवणे आणि इराणला जोडणारी महत्त्वाची वायुवाहिनी (गॅस पाइपलाइन) उभारण्यासाठी चीन त्या देशात ८.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांची दर्जावाढ करण्याचा अधिकार असलेल्या पाकिस्तानातील सेंट्रल डेव्हलपमेंट वर्किंग पार्टी’ (सीडीडब्ल्यूपी)ने बुधवारी १० अब्ज अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या

आगामी वर्षांत होऊ घातलेल्या दूरसंचार ध्वनिलहरींकरिता (स्पेक्ट्रम) लिलावात, बोली लावणाऱ्या कंपन्यांच्या वार्षिक महसुलाच्या ३ टक्के प्रमाणात वापर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दूरसंचार आयोगाच्या आंतरमंत्रीस्तरीय गटाने मांडला आहे. यामुळे २३०० मेगाहर्ट्झसाठीच्या पुढील वर्षांच्या ध्वनिलहरी लिलावात भाग घेण्यास सज्ज असलेल्या तीन मोठय़ा दूरसंचार कंपन्यांचा भार २०१० मधील प्रक्रियेच्या तुलनेत तुलनेत

सरकारने गतवर्षी ३० ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत विक्री केले गेलेल्या रोख्यांमध्ये नियमित खरेदी-विक्री व्यवहारांना येत्या सोमवारपासून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई)च्या रोखविभागात पहिल्यांदाच सुरु होतील. प्रत्यक्ष सुवर्ण धातू खरेदी न करता सोन्यांत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय असून, भांडवली बाजारात खरेदी-विक्रीची मुभा मिळाल्याने जास्तीत जास्त लोकांचा

एक प्रमुख म्युच्युअल फंड घराणे असलेल्या बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाला, हाँगकाँगस्थित द अ‍ॅसेट मॅगेझीन या नियतकालिकाने ७ जून २०१६ रोजी झालेल्या द अ‍ॅसेट ट्रिपल ए इन्व्हेस्टमेंट अवार्ड २०१६या पुरस्कार सोहळ्यात वर्षांतील सर्वोत्तम मालमत्ता व्यवस्थापन कंपनीअसा बहुमान बहाल करण्यात आला. आशियातील वित्तीय उद्योगाचा मागोवा घेणारे द अ‍ॅसेट हे एक ख्यातकीर्त नियतकालिक आहे. भारतीय

सेबीद्वारे निश्चित १९०० कोटी राखीव किंमतीला लागेल बोली ऑनलाइन लिलाव प्रक्रियेद्वारे सहाराच्या आणखी काही मालमत्तांचा लिलाव येत्या महिन्यात होऊ घातला आहे. नव्या १६ ठिकाणच्या मालमत्तांवर बोलीसाठी सेबीकडून १,९०० कोटीर रुपयांची राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीच्या पाच मालमत्तांसाठी निर्धारीत केलेली १,२०० कोटींची किंमत मिळून आता एकूण ३,१०० कोटी रुपये वसुल करण्याची

गोदरेज अप्लायन्सेसने पुण्याजवळील शिरवळ आणि पंजाबमधील मोहाली या दोन ठिकाणच्या घरगुती उपकरणे उत्पादन प्रकल्पांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अंदाजे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या याबाबतच्या ब्राऊनफिल्डप्रकल्पांमुळे दोन्ही ठिकाणी कंपनीच्या वातानुकूलित यंत्रवॉिशग मशीन तसेच रेफ्रिजरेटर यांचे उत्पादन वाढण्यास सहकार्य होणार आहे. केंद्र सरकारच्या मेक इन

तामिळनाडूमध्ये राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना औद्योगिक कलह कायदा, १९४७ अन्वये कामगार संघटनाबांधण्याची मुभा देणारा दूरगामी परिणाम साधणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर या उद्योग क्षेत्रातून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पुढे आल्या आहेत. आयटी कंपन्यांतील कर्मचारी हे त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी संघटना बांधू शकतील आणि औद्योगिक कलह कायदा, १९४७

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email