Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-09-06-2016-www.KICAonline.com-Marathi


सरकारने नियोजित १०० स्मार्टसिटीपैकी पहिल्या टप्प्यात २० स्मार्टसिटी बनविण्याची योजना सुरू केली असताना वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक प्रमुखांची उच्चस्तरीत बैठक सोमवारी घेतली. यात स्मार्टसिटीसाठी अनुरूप अशी टेकसॅव्ही बँकींग प्रणाली तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. अर्थमंत्री जेटली यांनी या संदर्भातल्या सूचना दिल्या.स्मार्ट सिटी मध्ये डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर


देशातील गरिबी हटविण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी काही उपाय सुचवले असून अशा स्थितीवर खरोखरच मात करण्यासाठी प्रतिव्यक्ती किमान ४ लाख उत्पन्न असायला हवे, असे म्हटले. प्रतिव्यक्ती या प्रमाणात उत्पन्न असेल, तर गरिबीवर मात करणे खरोखरच शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत,

मुंबई : नवी मुंबईजवळच्या दिघ्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी नागरिकांची मुदतवाढीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अनधिकृत घर ३१ मेपर्यंत घर रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर दिघावासीयांनी मुदतवाढीची मागणी केली होती. ती मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली असून उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मागितलेला वेळही नाकारण्यात

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा आणि सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कायदा मंत्रालयाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मार्च महिन्यात भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मांडली होती. वेगवेगळ्या वेळी विविध राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांमुळे सरकारच्या

झपाटय़ाने प्रगती करीत असलेल्या ऑनलाइन खरेदीच्या बाजारपेठेतील दमदार वाढीच्या संधींना हेरून, ई-व्यापार क्षेत्रातील महाकाय अमेरिकी कंपनी अ‍ॅमेझॉनने येत्या काळात भारतात ३ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे २०,१०० कोटी रुपयांची) गुंतवणुकीचा मानस असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्याधिकारी जेफ बेझोज यांनी ही

जपानची कार निर्माता सुझूकी मोटर कॉर्पोरेशनने आपल्या छोटय़ा कारची इंधन कार्यक्षमता (माइलेज) हे वाजवीपेक्षा अधिक दाखविणारी सदोष चाचणी यंत्रणा वापरात आणल्याने निर्माण झालेल्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर, कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ओसामू सुझूकी यांनी त्यांच्याकडे असलेल्या मुख्याधिकारी (सीईओ) या पदापासून मुक्त होत असल्याचे बुधवारी घोषित केले. कंपनीचे कार्यकारी

येल विद्यापीठाच्या सिंगापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक व साहित्यिक अशी पराशर कुलकर्णी यांची ओळख. त्यांना नुकतेच राष्ट्रकुल लघुकथा पारितोषिक मिळाले आहे. हे पारितोषिक प्रथमच भारतीय लेखकाला मिळाले हे विशेष. कुलकर्णी हे समाजशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांनी शैक्षणिक पातळीवरही संशोधन केले आहे. त्यांचा मुख्य विषय हा वसाहतकालीन भारतातील महिलाविरोधी हिंसाचार व धर्म हा आहे.

संकटग्रस्त मालमत्तेच्या समस्या सोडवण्यासाठीच्या व्यवसायातील कंपन्यांसाठी परिचालन व रचनात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने धोरण ठरवण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या नव्या व्यवसाय मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुमंत किदांबी यांची नेमणूक केल्याची घोषणा एडलविज समूहाने केली आहे. अल्वारेज आणि मार्सल या कंपनीतून सुमंत किदांबी एडलविजमध्ये रुजू झाले आहेत. भारतातील खासगी विमान कंपन्यांची

वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेतील काही जुन्या ताऱ्यांचे आवाज टिपले असून, त्यामुळे आकाशगंगेबाबत नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. आकाशगंगेचे वस्तुमान व वय यावर त्यातून प्रकाश पडणार आहे. बर्मिगहॅम विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे, की एम ४ तारकासमूहातील ताऱ्यांचे हे आवाज आहेत. हा तारकासमूह १३ अब्ज वर्षे जुना आहे. नासाच्या केप्लर मिशनमधील माहिती वापरून वैज्ञानिकांनी ताऱ्यांच्या

जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा १४१ वा क्रमांक लागला आहे. बुरूंडी, सर्बिया व बुर्किना फोसो या देशांपेक्षाही भारतात अशांतता जास्त आहे असा या क्रमवारीचा अर्थ होतो. २०१५ मध्ये हिंसाचारामुळे भारतात ६८० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असेही याबाबतच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. एकूण १६३ देशांची शांततेच्या मुद्दय़ावर क्रमवारी इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने लावली आहे. त्यात सीरिया पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण सुदान, इराक,

फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत २३ देशांतील विविध खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत अव्वल स्थानी असून, त्याची कमाई तब्बल ८ कोटी ८० लाख अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. यातील ५ कोटी ६० लाख अमेरिकी डॉलर्स

येथील फोबर्स मासिकाने जगातील सर्वाधिक मिळकत असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या १०० खेळाडुंची यादी जाहीर केली असून त्यात रिअल माद्रिदचा खेळाडू ख्रिस्तिएनो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर तर बार्सेलोनाचा स्ट्रायकर लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत फुटबॉलपटू, टेनिस खेळाडू, गोल्फ, बॉक्सिंग आणि गोल्फ या खेळातील खेळाडुंचा अधिक करून समावेश आहे.  या यादीत प्रथम येण्याचा मान

मुंबई : बीसीसीआयनं यंदाच्या सिझनमध्ये भारतात होणाऱ्या मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सप्टेंबरमध्ये न्यूझिलंड विरुद्धच्या सीरिजपासून भारताचा घरच्या मैदानातला सिझन सुरु होईल. या सिझनमध्ये भारत घरच्या मैदानात तब्बल 13 टेस्ट, 8 वनडे आणि 3 टी 20 अशा एकूण 24 मॅच खेळणार आहे.  पुणे, राजकोट, विशाखापट्टणम, धर्मशाला, रांची आणि इंदौर या स्टेडियमवर पहिल्यांदाच टेस्ट मॅच होणार आहे. यंदाच्या

नवी दिल्ली - भारताच्या टिंटू लुका हिने ऑलिंपिकच्या दृष्टीने ८०० मीटर शर्यतीत दोन मिनिटे वेळ देण्याचे उद्दिष्ट प्राज येथील स्पर्धेत साध्य केले. तिने शर्यतीत रौप्यपदक मिळविताना मोसमातील २ मिनिटे ६१ सेकंद ही मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली. आईसलॅंडच्या अनिता हेन्‍रिक्‍सडॉटिर हिने केवळ शतांश सात सेकंदाने तिला मागे टाकून सुवर्णपदक पटकावले. टिंटूची ही वेळ जागतिक सर्वोत्तम वेळेत तिसाव्या स्थानावर आहे.

लंडन - टेनिस विश्‍वातील माजी अव्वल मानांकित खेळाडू मारिया शारापोवा हिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने उत्तेजक सेवन प्रकरणात दोन वर्षांची बंदी घातली आहे. आयटीएफने बुधवारी हा निर्णय घेतला. पाचवेळची ग्रॅंड स्लॅम विजेती २९ वर्षीय शारापोवा हिची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील कामगिरी पुसली जाईल. तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्याचबरोबर ती विंबल्डन आणि ऑलिंपिक स्पर्धेतही

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email