Pages

Follow by Email

Saturday, 4 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-06-2016-www.KICAonline.com-marathi


आपल्या मेहनतीच्या बळावर उद्योगक्षेत्रात नवीन उंची गाठणाऱ्या अमेरिकेतील ६० श्रीमंत आणि यशस्वी महिलांची यादी फोर्ब्सने जाहीर केली असून, मूळ भारतीय असलेल्या दोन महिलांचा यात समावेश आहे. नाविन्यपूर्णता आणि शोधाचा ध्यास या दोन मूलभूत गोष्टींच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले. भारतात जन्मलेल्या निरजा सेठी या यादीमध्ये १६ व्या स्थानावर, तर जयश्री उल्लाल ३० व्या स्थानावर आहेत. आपले पती भारत देसाई यांच्यासोबत निरजा यांनी आयटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. शनिवारी ते नवी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना होतील, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संपूर्ण दौऱ्याची माहिती त्यांनी दिली. मोदी अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना भेट देणार आहेत. सहा जून रोजी मोदी अमेरिकेमध्ये पोहोचणार असून, सात जूनला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. त्याचदिवशी
आण्विक इंधन पुरवठादार देशांच्या गटाचे (न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताने १२ मे रोजी अधिकृतरीत्या अर्ज दाखल केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपासून (४ जून) सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यात भारताची बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी होण्याचे संकेत दिसत आहेत. एनएसजीसदस्य देशांच्या ९-१० जून रोजी व्हिएन्ना येथे होणाऱ्या बैठकीत भारताच्या सदस्यात्वाविषयी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक व्यक्तीला किमान प्रमाणात सुरक्षित पाणीमिळण्याच्या हक्काची तरतूद असलेला नवा कायदा लवकरच येऊ घातला आहे. पाण्याचे संरक्षणव संवर्धन करणे या प्रस्तावित कायद्यात राज्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनासाठी पाणीमिळण्यास पात्र राहील आणि पाण्याची किंमत देण्याची क्षमता नसल्याच्या कारणासाठी कुणालाही पाणी नाकारले जाणार नाही, असे नॅशनल वॉटर फ्रेमवर्क बिलमध्ये म्हटले आहे. पाणी ही प्राथमिक गरज असून, प्रत्येक मनुष्याला
कर्करोगाच्या पेशींचा सुनियंत्रित मृत्यू घडवण्यात उपयोगी ठरेल अशी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यामुळे कर्करोगाला शरीरातूनच विरोध होईल अशी व्यवस्था करणे शक्य आहे. विशेष म्हणजे या संशोधनात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा सहभाग आहे. अ‍ॅपॉटटॉसिस या क्रियेत नैसर्गिकरित्या पेशींचा मृत्यू होत असतो त्यामुळे शरीरातील अनावश्यक पेशी नष्ट होतात त्यामुळे कर्करोग होत नाही पण
विधान परिषद निवडणुकीत दोन अतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या भाजपकडून शुक्रवारी दोन्ही अर्ज मागे घेण्यात आले. प्रसाद लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काही तासांतच अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेल्या मनोज कोटक यांनीही आपला अर्ज मागे घेतला. यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर विधान परिषदेच्या १० जागांकरिता आता १२ अर्ज दाखल होते. संख्याबळानुसार भाजपचे पाच
 सुपुत्र सागर तुकाराम बांदेकर यांची दिल्लीच्या दबंग प्रो. कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. येत्या २५ जून रोजी होणाऱ्या प्रो कबड्डी स्पर्धेत दबंग दिल्ली संघ सहभागी झाला आहे. या संघाचा सराव पनवेल येथील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केलेल्या सागर बांदेकर यांच्या निवडीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी असलेला सागर बांदेकर हा शिवभवानी
एकनाथ खडसे यांनी शनिवारी गैरव्यवहारांच्या आरोपांवरून राजीनामा दिल्यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जळगावमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला. तर, दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थक आणि नागरिकांनी सर्व दुकाने बंद करत त्यांच्या राजीनाम्याचा निषेध केला. खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, जळगावमधील शिवसैनिकांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. जळगावमध्ये एकनाथ
भारताच्या महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी आणि ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामन यांनी आशियाई खंडनिहाय महिला आणि खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदकाला गवसणी घालून इतिहास घडवला. संपूर्ण स्पध्रेत शानदार कामगिरी करणाऱ्या भक्तीने अखेरच्या फेरीत व्हिएतनामच्या होआंग थि बाओविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून अव्वल स्थान पटकावले. भक्तीने सर्वाधिक ७ गुणांची कमाई केली. कझाकस्तानच्या दिनारा सादुआकासोव्हा आणि भारताच्या सौम्या
 जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. अली यांच्यावर फिनिक्स इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.बॉक्सिंगच्या जगभरातील चाहत्यांना मोहम्मद अली या नावाने एकेकाळी प्रचंड वेड लावले होते. गेली अनेक वर्षे अली पार्किन्सनने आजारी होते. या आजारामुळे संपूर्ण शरीर कंप पावतो. त्यामुळे आपल्या शरीरावर नियंत्रण राहत नाही. अनेक वर्षांपासून उपचार सुरू असूनही,
दुबई : 2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत. आयसीसीच्या टुर्नामेंटमध्ये भारत पाकिस्तान या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो असं वक्तव्य आयसीसीचे मुख्य अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले होते. रिचर्डसन यांच्या या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भारत-पाकिस्तानमधल्या सामन्यांमुळे
पेस आणि हिंगिस जोडीचं मिश्र दुहेरीतलं हे तिसरं ग्रँड स्लॅम ठरलंय. पेस आणि हिंगिसने फायनलमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इव्हान डॉडिग या दुस-या मानांकित जोडीवर 4-6, 6-4, 10-8 अशी टायब्रेकरमध्ये मात केली.पहिल्या सेटमध्ये सानिया-इव्हानने चांगला खेळ करत बाजी मारली. त्यानंतर मात्र पेस-
रिलायन्स फौंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाच्या सदस्यपदासाठी नामांकन मिळाले आहे. त्या पहिल्या भारतीय महिला आहेत, की ज्यांची ऑलिम्पिकच्या सदस्य सदस्य निवडीसाठी नामांकन मिळाले आहे. ऑलिम्पिक संघाने नीता अंबानी यांचे नामांकन केले आहे.   ऑस्ट्रेलियातील  रिओ दे जेनेरो येथे नवीन समिती निवड २ ते ४ ऑगस्ट दरम्यान पार

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email