Pages

Follow by Email

Wednesday, 1 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-01-06-2016-www.KICAonline.com-Marathi


बॅंकॉक, दि. 1 - थायलंडमध्ये असलेल्या 'टायगर टेम्पल'  परिसरात वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. 
पश्चिमेकडील कांचनाबुरी प्रांतात असलेल्या 'टायगर टेम्पल'  परिसरात वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील वन अधिका-यांनी दिली. त्यामध्ये एकूण 40 बछड्यांचा समावेश आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात


‘फॉन्समध्ये होणारी 15 वी युरोपियन अजिंक्यपद  स्पर्धा म्हणजेच ‘युरो-2016’चे वेध संपूर्ण फुटबॉल जगताला लागलेले आहेत. दि. 10 जून ते 10 जुलै या महिनाभराच्या कालावधीत युरोपमधील अव्वल संघ यात एकमेकांशी लढताना दिसतील. फिफा विश्‍वचषक स्पर्धेनंतर अतिशय महत्त्वाची व प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितले जाते.  वेन रुनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, इकर कॅसिलास, बुफॉन यासारख्या महान

दिल्ली – 01 जून : सेवा करात आजपासून अर्धा टक्का वाढ अमलात येणार आहे. सेवा करात आजपासून कृषी कल्याण अधिभाराची भर पडणार आहे. त्यामुळे कालपर्यंत तुम्ही 14.5 टक्के सेवा कर भरत होतात, तो आजपासून 15 टक्के झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या अधिभाराची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर जगात अव्वल राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत भारतानं 7.6 टक्क्यांचा विकासदर गाठलाय.
आधीच्या वर्षीतल्या 7.2 टक्क्यांनाही यंदाच्या GDPनं मागे टाकलंय. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च या तिमाहीत जगभरातल्या अर्थव्यवस्था अस्थीर असताना भारतानं मात्र 7.9 टक्क्यांचा विकासदर कायम

नवी दिल्ली ः आयआयटी-बॉम्बेच्या 75 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात वेगवान स्पोर्टस् कार बनवली आहे. ही कार आता फॉर्म्युला स्टुडंट युके या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. जगभरातील विद्यार्थ्यांच्या शंभर टीमनी तयार केलेल्या अशाच सुपरकारशी या कारचा सामना होणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कारला ‘ओर्का’ असे नाव दिले आहे. या कारचे डिझाईन तयार करण्यासाठी

01 जून : गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे लोकप्रिय विनोदी अभिनेते रझाक खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय. मंगळवारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता त्यांना तातडीने होली फॅमिली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email