Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

एटीपी चॅलेंजर दुहेरीत दिवीज-पुरव विजेते


मॅंचेस्टर - भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजा यांच्या जोडीने मॅंचेस्टर एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ग्रास कोर्टवर झालेल्या स्पर्धेत त्यांनी ब्रिटनच्या केन आणि नील या स्कुप्स्की बंधूंवर ६-३, ३-६, ११-९ अशी मात केली. जोडी म्हणून हे त्यांचे तिसरे विजेतेपद आहे. दुहेरीत दिवीजने नववे, तर पुरवने सातवे विजेतेपद पटकावले. त्यांनी पहिल्या तीन मानांकित स्पर्धकांना हरविले. उपांत्य फेरीत त्यांनी मार्कस डॅनिएल-अँड्रीयस सिल्जेस्ट्रॉम या अग्रमानांकित जोडीला ७-५, ७-६ (७-३) असे हरविले होते.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email