Pages

Follow by Email

Wednesday, 8 June 2016

इलाईट पंच पॅनेलमध्ये भारताचे एस.रवि


आयसीसीच्या क्रिकेट पंचांच्या इलाईट पॅनेलमध्ये भारताच्या सुंदरम् रवि यांनी आपले स्थान कायम राखले आहे. तर सी. समशुद्दीन यांची एमर्जिंग पॅनेलमध्ये बढती झाली आहे. 2011 च्या ऑक्टोबरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 वर्षीय सुंदरम् रवी यांनी पंचगिरी क्षेत्रात अधिकृत पदार्पण केले होते. एस. रवी यांनी आतापर्यंत 11 कसोटी, 26 वनडे आणि 18 टी-20 सामन्यात पंचगिरी केली
आहे. गेल्यावर्षी ऍडलेड ओव्हल येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया  आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात रवि यांनी पंचगिरी केली होती. 46 वर्षीय सी. समशुद्दीन यांची आयसीसीच्या वनडे इमर्जिंग पंच पॅनेलमध्ये बढती झाली आहे. समशुद्दीन यांनी 7 वनडे आणि 10 टी-20 सामन्यात पंचगिरी केली आहे. आयसीसीच्या स्पर्धामध्ये समशुद्दीन यांची पंच म्हणून यापूर्वी निवड करण्यात आली होती, त्यात यु-19 वर्ल्ड कपचा समावेश होता.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email