Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

केरी होप विजेंदरचा प्रतिस्पर्धी

नवी दिल्ली - युरोपियन स्पर्धेतील माजी विजेता केरी होप पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या जागतिक बॉक्‍सिंग संघटनेच्या आशियाई अजिंक्‍यपद लढतीत विजेंदरसिंगचा प्रतिस्पर्धी असेल. ही लढत १६ जुलैस नवी दिल्ली येथेच होणार आहे. व्यावसायिक मुष्टियोद्धा होण्याचा निर्णय घेतल्यापासून भारताचा विजेंदरने सहाही लढती प्रतिस्पर्ध्याला ‘नॉक आऊट’ करून जिंकल्या आहेत. दुसरीकडे त्याचा प्रतिस्पर्धी होप याला ३०
लढतींचा अनुभव असून, यातील २३ लढती त्याने जिंकल्या आहेत. होप हा मूळचा वेल्सचा असला, तरी तो अलीकडेच ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे. तो मिडलवेट गटाचा चॅंपियन आहे. मात्र, विजेंदरशी लढण्यासाठी त्याने सुपर मिडलवेट गटात खेळण्याचा निर्णय घेतला.

होपला लोळविणार - विजेंदर
व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये पदार्पण करून जेमतेम वर्ष होत असले, तरी विजेंदरचा आत्मविश्‍वास चांगलाच दुणावलेला आहे. आशियाई लढतीसाठी ऑस्ट्रेलिया होप प्रतिस्पर्धी म्हणून निश्‍चित झाल्यावर, विजेंदर म्हणाला, ‘‘घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. होपला अगदी सहज लोळविण्याचा मला आत्मविश्‍वास आहे. ’’

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email