Pages

Follow by Email

Saturday, 4 June 2016

नरेंद्र मोदी उद्यापासून पाच देशांच्या दौऱ्यावर, ओबामांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. शनिवारी ते नवी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना होतील, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संपूर्ण दौऱ्याची माहिती त्यांनी दिली. मोदी अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना भेट देणार आहेत. सहा जून रोजी मोदी अमेरिकेमध्ये पोहोचणार असून, सात जूनला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. त्याचदिवशी
संध्याकाळी ते अमेरिकेतील उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. ९ जूनला मोदी भारतात परतणार आहेत.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email