Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

स्मार्टसिटी साठी बँकांना स्मार्ट होण्याचे आदेश


सरकारने नियोजित १०० स्मार्टसिटीपैकी पहिल्या टप्प्यात २० स्मार्टसिटी बनविण्याची योजना सुरू केली असताना वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक प्रमुखांची उच्चस्तरीत बैठक सोमवारी घेतली. यात स्मार्टसिटीसाठी अनुरूप अशी टेकसॅव्ही बँकींग प्रणाली तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. अर्थमंत्री जेटली यांनी या संदर्भातल्या सूचना दिल्या.स्मार्ट सिटी मध्ये डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर
होणार आहेत. डिजिटल पेमेंट मुळे रोखीचे व्यवहार अगदी कमी होतील. वीज, फोन, पाणी, ,वाहतूक, खरेदी यासारखे सर्व व्यवहार कार्ड अथवा ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. या शहरातील सर्व कुटुंबाना डिजिटल ट्रान्झॅक्शन साठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. परिणामी बँकाचा खर्चही कमी होणार आहे व त्यांचा वेळही वाचणार आहे.
या दृष्टीने बँकांनी सर्व एटीएम आधार लायक बनविणे आवश्यक आहे. सर्व चालू व नवीन बसविली जाणारी एटीएम बायोमेट्रीक ओळख पटविणारी करावी लागणार आहेत. म्हणजे बोटांचा ठसा ही ग्राहकाची ओळख असेल. त्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतील व फ्रॉड होणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email