Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या सायरनवर बंदी


पुदुच्चेरी – व्हीआयपी म्हणजेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील सायरनच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी घेतला आहे. राजभवनातील सुरक्षा रक्षक वाहनांचा व पायलट वाहनांचा देखील यामध्ये सामावेश आहे.राज्यपाल किरण बेदी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रुग्णवाहिकांना आणि अग्निशमन दलाच्या वाहनाना मात्र सायरनचा वापर करता येणार आहे. मात्र, व्हीआयपी
वाहनांचे विशेषाधिकार देखील रद्द करण्यात आले असून व्हीआयपी वाहनांसाठी आता वाहतूक थांबविली जाणार नसून, सामान्य लोकांची या वाहनांमुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक नियमनासाठी योग्य संख्येत कर्मचारी व अधिकारी नेमण्याचे आदेश दिले असल्याचेही या प्रसिद्धीपात्रकामध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email