Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

सूपर कीक : रोनाल्डो सर्वात श्रीमंत खेळाडू


येथील फोबर्स मासिकाने जगातील सर्वाधिक मिळकत असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या १०० खेळाडुंची यादी जाहीर केली असून त्यात रिअल माद्रिदचा खेळाडू ख्रिस्तिएनो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर तर बार्सेलोनाचा स्ट्रायकर लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत फुटबॉलपटू, टेनिस खेळाडू, गोल्फ, बॉक्सिंग आणि गोल्फ या खेळातील खेळाडुंचा अधिक करून समावेश आहे.  या यादीत प्रथम येण्याचा मान
गेली काही वर्षे सातत्याने गोल्फस्टार टायगर वुडस आणि  बॉक्सिंगपटू फ्लॉयवूड मायवेदर यांना मिळत असे. पण मायवेदरने निवृत्ती घेतली तर टायगर पाठीच्या आजाराने त्रस्त आहे. आता त्यांची जागा रोनाल्डो आणि त्यानंतर मेस्सी घेत आहेत.
रोनाल्डोची कमाई ही ८८ दशलक्ष डॉलर तर मेस्सीची कमाई ही ८१.४ दशलक्ष डॉलर इतकी होती. रोनाल्डोचे खेळासाठीचे मानधन ही प्रचंड मोठे आहेच, शिवाय नाईके, टॅग ह्यएर, हर्बालाइॅफ अशा कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये तो दिसतो. 
महिला खेळाडुंमधून टेनिसस्टार सेरेना विल्यम्स आणि मारिया शरापोव्हा यांचाही या यादीत समावेश आहे. 
लिब्रॉन जेम्स, स्टिफन करी, यांच्यानंतर रॉजर फेडररचा क्रमांक लागतो. 
धावपटू उसेन बोल्ट, फॉम्युला वन रेसर लेविस हॅमिल्टन यांचाही या यादीत समावेश आहे. 

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email