Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

देशातील गरिबी हटविण्यासाठी प्रतिव्यक्ती किमान ४ लाख उत्पन्न हवे


देशातील गरिबी हटविण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी काही उपाय सुचवले असून अशा स्थितीवर खरोखरच मात करण्यासाठी प्रतिव्यक्ती किमान ४ लाख उत्पन्न असायला हवे, असे म्हटले. प्रतिव्यक्ती या प्रमाणात उत्पन्न असेल, तर गरिबीवर मात करणे खरोखरच शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत,
हे सांगायला विसरले.सप्टेंबर महिन्यात आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू असताना त्याला बगल देत रघुराम राजन आपल्या कामात व्यस्त असून ते दररोज नवे काही तरी सांगत आहेत. राजन पुढे म्हणाले की, सध्या आपले प्रतिव्यक्ती उत्पन्न १५०० डॉलर आहे. या तुलनेत विचार केल्यास सिंगापूरचे उत्पन्न प्रतिव्यक्ती ५० हजार डॉलरवर पोहोचल्यामुळे आपल्याला आणखी ब-याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. तोपर्यंत आर्थिक सुधारणा करणे शक्य नाही. गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आज आपणही फार काही करू शकलो नाही. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था अजूनही अपेक्षाकृत आहे. प्रत्येक जण ६-७ हजार डॉलर्सपर्यंत मध्यम उत्पन्नाची अपेक्षा करतो.
यातून गरिबीवर मात करता येणे शक्य आहे. त्यासाठी तात्काळ उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. खरे म्हणजे सध्या अधिकाधिक मंडळी महागाई रोखणे आणि बॅलेन्स शीटचा ताळमेळ जुळविण्यातच व्यस्त आहे. परंतु आता प्रत्येकाला यापुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यातून आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. सध्या लोकांना असे वाटते की, देशात मध्यम आणि लघु उद्योग वेगात वाढत आहे. परंतु त्याकडेच दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे आपण काही अंशी वाढवून आकडेवारी सादर केल्याचीही चर्चा आहे. परंतु त्यातील वास्तव लक्षात घेऊन त्यादृष्टीने योग्य ते पाऊल उचलले पाहिजे, असेही रघुराम राजन यांनी म्हटले. देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्या तुलनेत आर्थिक विकासाला गती प्राप्त होईल, अशी स्थिती कमी आहे. त्यातच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यातून धिम्या गतीने आर्थिक विकास होत आहे. याचा फटका बसल्याने ताळमेळ जुळविणे कठीण बनले आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email