Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

करसन घावरी यांना हृदयविकाराचा झटका

शिमोगा - मुंबई आणि भारताचे माजी डावखुरे वेगवान गोलंदाज करसन घावरी यांना रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त चिटणीस पी. व्ही. शेट्टी यांनी
या वृत्तास दुजोरा दिला. आज त्यांच्यावर अँजोप्लास्टी झाल्याचे डॉक्‍टरांनी कळविल्याचे शेट्टी म्हणाले.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email