Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

इंग्लंडच्या जोडीने मोडला द्रविड-गांगुलीचा विक्रम


नॉटिंगहॅम : इंग्लंडमधील क्रिकेट मोसमात सुरू असलेल्या "रॉयल लंडन‘ एकदिवसीय स्पर्धेत सोमवारी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातील विक्रमांची मोडतोड झाली. त्याचबरोबर मैदानावर पहिल्या चेंडूपासून अखेरच्या चेंडूपर्यंत धावांचा पाऊस पडला. या सामन्यात इंग्लंडमधील सर्वोच्च भागीदारी आणि सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदला गेला. ट्रेंटब्रिज येथे नॉटिंगहॅमशायर आणि नार्दम्प्टनशायर असा हा सामना झाला. या सामन्यात नॉटिंगहॅमच्या रिकी वेसेल्स आणि मायकेल लम्ब यांनी 39.2 षटकांत 342 धावांची सर्वोच्च भागीदारी केली. वेसेल्स 97 चेंडूंत 146 धावांवर बाद झाला. लम्बने कौंटीमधील विक्रमी 184 धावांची खेळी केली. या भागीदारीच्या जोरावर नॉटिंगहॅमने 8 बाद 445 धावा केल्या. क्रिकेटविश्‍वातील प्रथम श्रेणी सामन्यातील ही दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली. 

धावांचा पाऊस नॉर्दम्प्टनशायरचा डाव सुरू झाल्यावरही कायम होता. तेवढ्याच जोशात त्यांच्याही फलंदाजांनी धावा केल्या. पण, शेवटी विजयासाठी त्यांना केवळ 20 धावा कमी पडल्या. त्यांचा डाव 425 धावांवर आटोपला त्यांच्याकडून रोरी क्‍लेईनवेल्ड्‌टने 128 धावांची खेळी केली. या सामन्यात 870 धावा झोडपल्या गेल्या. यापूर्वी 2002मध्ये सरे विरुद्ध ग्लॅमर्गान सामन्यात 877 धावा फटकावल्या गेल्या होत्या. 

वेसेल्स आणि लम्ब यांच्या भागीदारीने इंग्लंडमध्ये विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या सौरभ गांगुली-राहुल द्रविड यांची श्रीलंकेविरुद्धची 318 धावांची भागीदारी मागे टाकली. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली. ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल्स यांनी 2015 विश्‍वकरंडक स्पर्धेत झिंबाब्वेविरुद्ध केलेली 372 धावांची भागीदारी अजूनही सर्वोत्तम आहे. प्रथम श्रेणीमधील विक्रमी धावसंख्या सरेच्या नावावर असून, त्यांनी 2007 मध्ये ग्लूस्टरशायरविरुद्ध 4 बाद 496 धावा केल्या होत्या.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email