Pages

Follow by Email

Saturday, 4 June 2016

नीता अंबानींना ‘ऑलिम्पिक’चे नामांकन

रिलायन्स फौंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाच्या सदस्यपदासाठी नामांकन मिळाले आहे. त्या पहिल्या भारतीय महिला आहेत, की ज्यांची ऑलिम्पिकच्या सदस्य सदस्य निवडीसाठी नामांकन मिळाले आहे. ऑलिम्पिक संघाने नीता अंबानी यांचे नामांकन केले आहे.   ऑस्ट्रेलियातील  रिओ दे जेनेरो येथे नवीन समिती निवड २ ते ४ ऑगस्ट दरम्यान पार
पडणार आहे. रिलायन्स फौंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा असणाऱ्या नीता अंबानी यांचे नाव या निवडीच्या उमेदवार यादीत आले आहे. भारतात खेळासाठी दिलेले योगदान विचारत घेऊन त्यांना नामांकन मिळाले आहे. या समितीवर निवड झालेल्या सदस्याचे वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत सदस्यत्व कायम राहते, असा नियम आहे.     या नामांकनाबाबत प्रतिक्रिया देताना नीता अंबानी म्हणाल्या की, तरूणांच्या करिअरला आकार देण्याची शक्ती खेळात आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की ऑलिम्पिक संघाने माझ्या नावाची निवड केली आहे. हा भारताचा आणि भारतीय महिलांचा सन्मान आहे. मला या समितीवर संधी मिळाली तर मी पूर्णपणे योगदान देईल.  हा सन्मान मिळणाऱ्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला आहेत. यापूर्वी फोर्ब्सच्या यादीत त्यांना ‘आशियातील सर्वात प्रभावी महिला उद्योजिका’ असा सन्मान मिळाला आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email