Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना


मुंबई,दि. ७ - सध्या महाराष्ट्रात रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेक जण जखमी होतात. दरम्यान, अशा अपघातांमध्ये जखमी होणा-यांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तसेच, ही योजना फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणा-या अपघातग्रस्तांसाठी असणार असल्याची माहिती,
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली आहे. अपघातांतील जखमींच्या ऑपेरशन नंतर आवश्यक १२७ उपचार देखील नव्या योजनेत करण्यात येणार आहेत. योजनेतील नियमांचं पालन न केल्यास संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्याचाही या योजनेत समावेश असणार आहे. तसेच लहान मुलांचे, वार्धक्यातील अनेक आजारावर सुद्धा या योजनेच्यामार्फत उपचार करण्यात येणार आहेत, असेही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत, तर जवळपास २५0 जण जखमी झाले आहेत. गेल्या रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email