Pages

Follow by Email

Wednesday, 8 June 2016

द. आफ्रिका ऑस्ट्रेलियात खेळणार डे-नाईट कसोटी


ऍडलेड - दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऍडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी खेळण्यास मान्य केले असून, ही कसोटी 24 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या वर्षअखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आफ्रिकेचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध 15 डिसेंबरपासून दिवस-रात्र कसोटी खेळणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात गुलाबी चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा संघ दिवस-रात्र दोन कसोटी सामने खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये मध्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात असून, पर्थ आणि होबार्ट येथे पहिला व दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर ऍडलेडला हा दिवस-रात्र कसोटी खेळविला जाईल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारुन लॉर्गट म्हणाले, की खेळाडूंशी विचारविनिमय करुनच दिवस-रात्र कसोटी खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे कसोटी खेळण्याचा आम्हाला अनुभव नाही. एबी डिव्हिलर्स, डेल स्टेन, व्हर्नान फिलँडर आणि कगिसो रबाडा यांनी गुलाबी चेंडूवर सरावास सुरवात केली असून, हे खेळाडू प्रकाशझोतात सराव करत आहेत. कसोटी क्रमवारीत आफ्रिकेच्या संघाची पहिल्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email