Pages

Follow by Email

Saturday, 4 June 2016

एकनाथ खडसे यांनी शनिवारी गैरव्यवहारांच्या आरोपांवरून राजीनामा

एकनाथ खडसे यांनी शनिवारी गैरव्यवहारांच्या आरोपांवरून राजीनामा दिल्यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जळगावमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला. तर, दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थक आणि नागरिकांनी सर्व दुकाने बंद करत त्यांच्या राजीनाम्याचा निषेध केला. खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, जळगावमधील शिवसैनिकांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. जळगावमध्ये एकनाथ
खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे आनंद झाला नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय आवश्यक होता, अशी प्रतिक्रिया सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email