Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

टिंटूची मोसमातील सर्वोत्तम वेळ


नवी दिल्ली - भारताच्या टिंटू लुका हिने ऑलिंपिकच्या दृष्टीने ८०० मीटर शर्यतीत दोन मिनिटे वेळ देण्याचे उद्दिष्ट प्राज येथील स्पर्धेत साध्य केले. तिने शर्यतीत रौप्यपदक मिळविताना मोसमातील २ मिनिटे ६१ सेकंद ही मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली. आईसलॅंडच्या अनिता हेन्‍रिक्‍सडॉटिर हिने केवळ शतांश सात सेकंदाने तिला मागे टाकून सुवर्णपदक पटकावले. टिंटूची ही वेळ जागतिक सर्वोत्तम वेळेत तिसाव्या स्थानावर आहे.
माजी विश्‍वविजेती आणि लंडन ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती सेस्टर सेमेन्या हिने दिलेली १ मिनीट ५६.६४ सेकंद ही सध्याची सर्वोत्तम वेळ आहे. त्यानंतर बुरुंडीची फ्रान्सिन नियोन्साबा (१ः५६.६४ सेकंद) आणि फ्रान्सची रेनेली लॅमोट (१ः५८.०१ सेकंद) यांचा क्रमांक आहे.
टिंटू लुकाने २०१० मध्ये १ः५९.१७ सेकंद अशी वेळ देत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email