Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

अमेरिकन सैन्याची कमांडर झाली ‘मिस युएसए’


लास वेगास : अमेरिकेत सैन्याच्या कमांडरने ‘लॉजिस्टिक कमांडर आणि आयटी ऍनालिस्ट’ स्पर्धेत यंदा देशाऊना बार्बरा हिने मिस युएसए किताब जिंकला असून एका प्रश्नांचे उत्तर देताना तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना चुकीच्या मुद्यांवर न लढण्याचा सल्ला दिला आहे.अमेरिकेत सैन्याच्या कमांडरने ब्युटी स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून बार्बरा आता या स्पर्धेनंतर मिस
युनिव्हर्ससाठी पात्र ठरली आहे. यावर बार्बरा म्हणाली, अमेरिकेत या वर्षी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच सैन्यातील अनेक लोक तणावग्रस्त असल्यामुळे या दोन्ही मुद्यांवर मी काम करणार आहे. बार्बराने यावेळी नचुकता राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार व नेहमी वादग्रस्त विधान करणा-या डोनाल्ड ट्रम्प यांनाही खडे बोल सुनावले. चुकीच्या मुद्यांवर निवडणुका लढविण्यापेक्षा सध्या देशात उद्भवलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला तिने दिला.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email