Pages

Follow by Email

Wednesday, 1 June 2016

विनोदी अभिनेते रझाक खान काळाच्या पडद्याआड


01 जून : गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे लोकप्रिय विनोदी अभिनेते रझाक खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय. मंगळवारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता त्यांना तातडीने होली फॅमिली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बॉलिवूडचे कॉमेडियन रझाक खान यांनी 90 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. क्या कूल है हम, गोलमाल, इश्क ,ऍक्शन जॅक्सन, राजा हिंदुस्थानी, हेराफेरी,हॅलो ब्रदर या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. बी-टाऊनचे ‘निंजा चाचा’, ‘बाबू बिसलरी’, ‘मुन्ना मोबाईल’ आणि ‘लक्की चिकना’ अशीही त्यांची ओळख होती. परंतु, जॉनी लिव्हर, कादर खान अशा कॉमेडियन अभिनेत्यांसारखी प्रसिद्धी त्यांना मिळू शकली नाही. अलीकडेच रझाक खान यांनी कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये गोल्डन भाईची भूमिका साकारली होती. तसंच त्यांनी सलमान खान, गोविंदा, आणि शाहरुख खानसोबतही काम केलंय. रझाक खान यांच्यावर गुरुवारी दुपारी भायखळातील स्मशानभूमीत दफन करण्यात येणार आहे. रझाक यांचा मुलगा असद परदेशात असून तो आल्यानंतरच अंत्यविधी होणार आहेत.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email