Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

उत्तेजकाचे प्रमाण टाळण्यासाठी महासंघाचे नियम


पहिल्या ऑलिंपिकपासून वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा होतात; पण त्यापुरताच हा स्पर्धेचा इतिहास नाही. कदाचीत विश्‍वास बसणार नाही; पण हा खेळ फिल्ड प्रकाराचा भाग होता. त्यात एका हाताने वजन उचलणे आणि दोन हाताने वजन उचलणे असे प्रकार होते. त्यानंतर खेळात हळूहळू बदल होत गेले आणि ऑलिंपिक स्पर्धात महिला वेटलिफ्टिंग सुरू होण्यास नव्या सहस्त्रकाचा उदय होण्याची प्रतीक्षा करावी लागली. ही स्पर्धा
भारतासाठी महत्त्वाची तसेच ऐतिहासिक ठरली. याच स्पर्धेत मल्लेश्‍वरीने पदक जिंकले आणि ती भारताची ऑलिंपिक पदक जिंकलेली पहिली महिला क्रीडापटू ठरली. भारताच्या वेटलिफ्टिंग सहभागास १९५६ च्या स्पर्धेपासून सुरवात झाली.
रिओ ऑलिंपिकच नव्हे, तर त्यापूर्वीच्या ऑलिंपिक स्पर्धेतील पात्रतेत फारसा फरक पडलेला नाही. रिओ ऑलिंपिक वेटलिफ्टिंगच्या पात्रतेस २०१४ च्या जागतिक स्पर्धेपासून सुरवात झाली. त्याचबरोबर गतवर्षीची जागतिक स्पर्धेतील कामगिरीही लक्षात घेतली जाते. या दोन्ही स्पर्धांत प्रत्येक देशाच्या सर्वोत्तम सहा खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली जाते. त्यातही महिलात अव्वल २१ मध्ये आणि पुरुषात अव्वल २४ मध्ये स्थान असेल तरच गुण दिले जातात. त्यातून मिळालेल्या गुणानुसार स्थान मिळते; पण एका देशाच्या जास्तीत जास्तीत दहा (सहा पुरुष आणि चार महिला) यांनाच स्थान मिळते. या जागतिक स्पर्धेतील क्रमवारीनुसार एका देशाचे जास्तीत जास्त दहा किंवा कमीतकमी चार स्पर्धक पात्र ठरतात. 

जागतिक स्पर्धेनंतर टप्पा असतो, तो आंतरखंडीय स्पर्धेचा. यातही सांघिक कामगिरीनुसार कोटा दिला जातो. मात्र, त्यात जागतिक स्पर्धेतून कोटा न मिळवलेल्या देशांनाच कोटा मिळतो. भारतास त्यानुसारच दोन स्पर्धकांचा कोटा मिळाला आहे. अर्थात हे प्रत्येक खंडानुसार भिन्न असते.

ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना थेट ऑलिंपिकमध्ये खेळता येत नाही. त्यासाटी दोन वर्षांतील किमान दोन स्पर्धांतील सहभाग आवश्‍यक असतो. त्यात भारताबाबत बोलायचे झाले, तर राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत. तसेच गतवर्षीच्या चार ग्रां. प्रि. स्पर्धांचाही समावेश आहे. याचबरोबर जागतिक कुमार स्पर्धेतील सहभागही गृहीत धरला जातो. 

प्रत्येक खेळात उत्तेजकांचे प्रमाण वाढतच असते. मात्र, वेटलिफ्टिंग महासंघाने याबाबतचे नियम खूपच खडतर केले आहेत. ऑलिंपिक पात्रता ठरवताना ही बाब लक्षात घेतली जाते, याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. त्यामुळेच तर रिओ ऑलिंपिकमध्ये बल्गेरियाच्या प्रवेशास पूर्ण मनाई करण्यात आली आहे, तर रुमानियाचा एक कोटा रद्द करण्यात आला आहे. वेटलिफ्टिंग महासंघाचे याबाबतचे नियम खूपच कठोर आहेत, त्यामुळे प्रसंगी यजमानांना प्रवेश नाकारल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. 
-डी. चंद्रहास राय, भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सचिव

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email