Pages

Follow by Email

Wednesday, 1 June 2016

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवली देशातील सर्वात वेगवान स्पोर्टस् कार


नवी दिल्ली ः आयआयटी-बॉम्बेच्या 75 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात वेगवान स्पोर्टस् कार बनवली आहे. ही कार आता फॉर्म्युला स्टुडंट युके या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. जगभरातील विद्यार्थ्यांच्या शंभर टीमनी तयार केलेल्या अशाच सुपरकारशी या कारचा सामना होणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कारला ‘ओर्का’ असे नाव दिले आहे. या कारचे डिझाईन तयार करण्यासाठी
त्यांना नऊ महिन्यांचा कालावधी लागला. नुकतेच आयआयटीच्या कॅम्पस ऑडिटोरियममध्ये या कारचे अनावरण करण्यात आले. ही कार तयार करण्यासाठी काही कंपन्यांना प्रायोजक करण्यात आले होते. ही कार 3.47 सेकंदांमध्ये शून्यापासून ताशी 100 किलोमीटरचा वेग घेते. पोर्श, टेल्सा किंवा ऑडीच्या स्पोर्टस् कारपेक्षाही ही कार अधिक वेगवान आहे. या कारमध्ये विशेष असे स्टील फ्रेम चेसीस असून कार्बन फायबरची बॉडी आहे. त्यामुळे वाहनाचे वजन हलके झाले असून अधिक वेग असतानाही कार स्थिर राहते.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email