Pages

Follow by Email

Friday, 10 June 2016

अमर वार्डे यांना इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम पुरस्कार

अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांना किरगिस्तानमधील ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक कामगिरी पाहून किरगिस्तानमधील ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्कारासाठी अमर वार्डे यांची निवड करण्यात आली होती. २१ मे २०१६ रोजी किरगिस्तानमधील बिशकेक येथे झालेल्या इंटरनॅशनल अचिव्हर्स समिटमध्ये किरगिस्तानमधील भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. काही अपरिहार्य कारणांमुळे अमर वार्डे या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहू शकले नव्हते. ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनने अमर वार्डे यांना पुरस्कार, सन्मानपत्र व सुवर्णपदक पोहोच केले. अमर वार्डे यांना यापूर्वी इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल व इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेने ज्वेल्स ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email