Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदी नारायणसामी विराजमान


पुद्दुचेरी – आज पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रिपदाची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्ही. नारायणसामी यांनी शपथ घेतली. या वेळी नारायणसामी यांच्यासह कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नारायणसामी यांच्यासह इतर पाच जणांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यूपीए सरकार पुद्दुचेरीमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आले असून पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी
नारायणसामी यांनी पार पाडली होती. त्यापूर्वी यूपीएच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. नारायणसामी यांनी पुद्दुचेरी विधानसभेची नुकतीच झालेली निवडणूक लढविली नव्हती, त्यामुळे पुढील सहा महिन्यांत आमदारपदी निवडून यावे लागणार आहे. विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्री होणारे नारायणसामी हे दुसरे व्यक्ती आहेत.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email