Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या महिला नेत्या बनल्या सुषमा स्वराज


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत जगातील १० मोठ्या नेत्यांच्या यादीत आहे. यामध्ये आता पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव देखील समाविष्ट झाले आहे. याबाबतचा खुलासा ग्लोबल ट्विटरच्या वार्षिक अहवालानुसार झाला आहे. या यादीत पंतप्रधान मोदी तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना ट्विटरवर २ कोटी लोक फॉलो करतात. पंतप्रधान कार्यालय
पीएमओला १.१ कोटी फॉलोअर्स आहेत. ग्लोबल कम्यूनिकेशन्स फर्म बुर्सन-मार्सटेलरने केलेल्या अभ्यासानुसार सुषमा स्वराज जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला ठरल्या आहेत. त्यांना ५० लाख लोक फॉलो करतात. त्या सध्या या यादीत १०व्या स्थानावर आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा डिजिटल वर्ल्ड मध्ये ७.५ कोटी फॉलोअर्ससह जगात पहिल्या स्थानावर आहे. फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि गूगल+ मध्ये ही ते पहिल्या स्थानावर आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email