Pages

Follow by Email

Wednesday, 1 June 2016

आजपासून सगळंच अर्ध्या टक्क्याने महाग, कृषी अधिभार लागू


दिल्ली – 01 जून : सेवा करात आजपासून अर्धा टक्का वाढ अमलात येणार आहे. सेवा करात आजपासून कृषी कल्याण अधिभाराची भर पडणार आहे. त्यामुळे कालपर्यंत तुम्ही 14.5 टक्के सेवा कर भरत होतात, तो आजपासून 15 टक्के झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या अधिभाराची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे.

त्यामुळे हॉटेलमध्ये खाणं, मोबाईलचं बील, रेल्वे, विमान, बससेवा, जाहिराती,ओला, उबरसारख्या टॅक्सी सेवा, रेल्वे आणि विमान तिकीट बांधकाम यासह अनेक सेवा आजपासून अर्ध्या टक्क्याने महाग होणार आहे. याआधी सरकारनं 0.2 टक्के स्वच्छ भारत अधिभार लावला होता. त्यात आता कृषी कल्याण अधिभाराची भर पडलीय. विशेष म्हणजे या अधिभारातून जमा झालेले पैसे केंद्र सरकारच्या फंडमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे किती पैसे जमा झाले, ते कृषी कल्याणावरच खर्च झाले का, हे कळायचा मार्ग नाही. कारण या फंडाचा हिशेब देण्यास सरकार कायदेशीररित्या बांधिल नसतं.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email