Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

नोवाक जोकोविचने जिंकले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम


नंबर वन सीडेड नोवाक जोकोविचने आपले करियर ग्रँड स्लॅमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरेचा चार सेटमध्ये पराभव करून चँपियनशीप मिळविली. सर्बियाच्या या खेळाडूने रविवारी अँडी मरेने पहिला सेट घेतल्यानंतरही नेटाने पुढील तिन्ही सेट सलग जिंकले. नोवानने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिकली आहे.एकाच वर्षात चारी ग्रँडस्लॅम जिकणार्‍या खेळाडूंच्या
यादीत नोवाकचा समावेश झाला असून अशी कामगिरी करणारा तो आठवा खेळाडू ठरला आहे. त्याला बक्षीसापोटी १५ कोटी रूपये मिळाले आहेत. रॉड लेव्हर नंतर म्हणजे १९६९ नंतर एकाचवेळी चारी ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत १२ ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. यापूर्वी पीट सँप्रास व स्पेनचा राफेल नदाल यांनी प्रत्येकी १४-१४, स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सर्वाधिक १७ ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email