Pages

Follow by Email

Tuesday, 7 June 2016

फेसबुकच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी उमंग बेदी


बंगळुरु, दि. ७ - सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी  उमंग बेदी यांची नियुक्ती केली आहे. सध्या फेसबुकच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी किर्थिगा रेड्डी आहेत. त्यांच्या जागी उमंग बेदी यांची निवड करण्यात आली आहे. तर, किर्थिगा रेड्डी या अमेरिकेतील फेसबुकच्या मुख्यालयात उच्च पदावर काम करणार आहेत. उमंग बेदी हे फेसबुकच्या
आधी अॅडोब कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे भारतामध्ये अॅडोब कंपनीच्या मार्केटींगची जबाबदारी सोपविण्यात आली होती. येत्या जुलै महिन्यापासून उमंग बेदी फेसबुकमध्ये रुजू होतील. तर किर्थिगा रेड्डी या ऑगस्टमध्ये नवीन उच्च पदावर अमेरिकेतील मुख्यालयात असणार आहेत.  आशियातील इतर देशांच्या तुलनेत सध्या भारतात फेसबुक वापरकर्त्यांचे प्रमाण जास्त आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email