Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

मारिया शारापोवावर दोन वर्षांची बंदी


लंडन - टेनिस विश्‍वातील माजी अव्वल मानांकित खेळाडू मारिया शारापोवा हिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने उत्तेजक सेवन प्रकरणात दोन वर्षांची बंदी घातली आहे. आयटीएफने बुधवारी हा निर्णय घेतला. पाचवेळची ग्रॅंड स्लॅम विजेती २९ वर्षीय शारापोवा हिची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील कामगिरी पुसली जाईल. तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्याचबरोबर ती विंबल्डन आणि ऑलिंपिक स्पर्धेतही सहभागी होऊ शकणार नाही. ऑस्ट्रेलियन स्पर्धे दरम्यानच आपण उत्तेजक घेतल्याची कबुली तिने दिली होती.

शारापोवा अपील करणार
दरम्यान, शारापोवाने बंदीविरुद्ध ल्युसर्न (स्वित्झर्लंड) येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय जाहीर केला. बंदीचे वृत्त आल्यानंतर काही वेळातच तिने ‘फेसबुक पेज’वर विस्तृत निवेदन दिले. तसे ‘ट्‌विट’ही तिने केले. तिने म्हटले आहे, की दोन वर्षांची बंदी अयोग्य आणि कठोर आहे. ही कारवाई मला मान्य होऊ शकत नाही. सुरवातीला माझ्यावर चार वर्षांच्या बंदीची मागणी ‘आयटीएफ’ने केली होती; पण मी जे केले ते हेतुपुरस्सर नव्हते, हे मान्य झाले. त्यामुळे मी क्रीडा लवादाकडे दाद मागेन.’

‘आयटीएफ’ने शारापोवासंदर्भात कठोर भूमिका घेतली होती. जे काही झाले त्यास ती स्वतः जबाबदार आहे आणि ती स्वतःच्याच चुकीमुळे दुर्दैवी ठरली आहे, असे परखड मत व्यक्त करण्यात आले होते. कोणते औषध घेण्याची परवानगी आहे आणि कोणते नाही, याची यादी तिने तपासली नाही आणि ही तिचीच चूक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email