Pages

Follow by Email

Wednesday, 8 June 2016

सर्वाधिक कमाईत सेरेनाची शरापोव्हावर मात


आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या कमाई यादीमध्ये अमेरिकेच्या टॉप सीडेड सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शरापोव्हाला मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे. सेरेनाला नुकत्याच झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पेनच्या मुगूरूझाने या स्पर्धेत सेरेनाला पराभूत करून पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळविले. महिला टेनिसपटूंच्या कमाई यादीमध्ये गेली 11 वर्षे रशियाच्या
शरापोव्हाने आपले पहिले स्थान भक्कम ठेवले होते. पण सेरेनाने यावेळी तिला मागे टाकताना गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत 28.9 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. सदर माहिती येथील एका मासिकाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत शरापोव्हा 21.9 दशलक्ष डॉलर्स कमाईसह दुसऱया तर अमेरिकेचा मार्शल आर्टस् रोनेडा रूसे 14 दशलक्ष डॉलर्स कमाईसह तिसऱया स्थानावर आहे.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email