Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

‘एनएसजी’ : स्वीत्झर्लंडचा भारताला पाठिंबा

आपल्या पाच देशांच्या दौऱ्यापैकी स्वीत्झर्लंडचा दौरा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरकला. या दौऱ्यात त्यांनी स्वीत्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष जोहन शेंडर अम्मान यांची भेट घेऊन एनएसजी ग्रुपमध्ये भारताताचा समावेश आणि काळ्या पैशाबाबत चर्चा केली. यावेळी भारताला एनएसजी ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी स्वीत्झर्लंडचा पाठिंबा राहिल, अशी ग्वाही अम्मान यांनी दिली. पतंप्रधान मोदी यांनी
याबाबत अम्मान यांचे आभार मानले.    आणुउर्जा पुरवठादार संघटनेच्या (एनएसजी) यादीत ४८ देशांचा समावेश आहे. यामध्ये स्वीत्झर्लंडचाही सहभाग आहे. त्यामुळे भारताला या यादीत सहभागी करून घेण्यासाठी स्वीत्झर्लंडचीही भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. पतंप्रधान मोदी यांनी आपल्या या दौऱ्यात या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून स्वीत्झर्लंडचा पाठिंबा घेण्यात यश मिळविले आहे. हा दौरा संपवून पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्याला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत स्वीत्झर्लंडच्या नैसर्गिक सौदर्याचे दर्शन सतत घडविणाऱ्या हॉलीवुडचे आभार मानले. तसेच एनएसजी ग्रुप सहभागाबाबत पाठिंबा दिल्याने अम्मान यांचेही आभार मानले आहेत.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email