Pages

Follow by Email

Wednesday, 8 June 2016

वेसल्स-लम्बकडून गांगुली-द्रविडचा विक्रम मागे


इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील नॉटिंगहॅमशायरच्या ट्रेंट बिज मैदानावर सोमवारी रिकी वेसल्स आणि मायकेल लम्ब यांनी विक्रमी भागिदारी (39.2 षटकांत 342 धावा) करताना यापूर्वीचा सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांचा विक्रम मागे टाकला.रॉयल लंडन वनडे चषक क्रिकेट स्पर्धेतील नॉटिंगहॅमशायर आणि नॉर्दम्प्टनशायर यांच्यातील सामन्यात खेळताना वेसल्स आणि लम्ब यांनी नॉटींगहॅमशायरतर्फे हा विक्रम
केला. वेसल्सने 97 चेंडूत 146 तर लम्बने 184 धावा झोडपल्या. जगातील अ दर्जाच्या या क्रिकेट सामन्यातील नॉटिंगहॅमशायरने दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. नॉटींगहॅमशायरने 8 बाद 445 धावा जमविल्या. त्यानंतर नॉर्दम्पटनशायरने 425 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 20 धावांनी गमवावा लागला. दिवसभरात 870 धावा नोंदविल्या गेल्या. 1999 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टाँटन येथे लंकेविरूद्धच्या सामन्यात भारताच्या सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांनी 318 धावांची भागिदारी केली होती. लम्ब आणि वेसल्स यांचा लिस्ट अ सामन्यातील हा तिसऱया क्रमांकाचा इंग्लीश विक्रम आहे. 2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विंडीजच्या गेल आणि सॅम्युअल्स यांनी झिबाब्वेविरूद्ध 372 धावांची विक्रमी भागिदारी केली होती.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email