Pages

Follow by Email

Thursday, 9 June 2016

अल्वारेज आणि मार्सल या कंपनीतून सुमंत किदांबी एडलविजमध्ये रुजू झाले आहेत.

संकटग्रस्त मालमत्तेच्या समस्या सोडवण्यासाठीच्या व्यवसायातील कंपन्यांसाठी परिचालन व रचनात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने धोरण ठरवण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या नव्या व्यवसाय मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुमंत किदांबी यांची नेमणूक केल्याची घोषणा एडलविज समूहाने केली आहे. अल्वारेज आणि मार्सल या कंपनीतून सुमंत किदांबी एडलविजमध्ये रुजू झाले आहेत. भारतातील खासगी विमान कंपन्यांची
फेररचना आणि कार्यवाहीची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. एडलविज असेट रिकन्स्ट्रक्शन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अ‍ॅटनी यांना सुमंत किदांबी साहाय्य करतील. ‘सीडीएसएल’ अध्यक्षपदी कृष्णमूर्ती मुंबई : देशातील दोन रोखे भंडारांपकी एक असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सíव्हसेसच्या (सीडीएसएल) अध्यक्षपदी टी. एस कृष्णमूर्ती यांची निवड झाली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी तीन वष्रे राहणार आहे. कृष्णमूर्ती हे निवृत्त सनदी अधिकारी असून त्यांनी फेब्रुवारी २००४ ते मे २००५ दरम्यान भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. भारताचे भारतीय महसूल सेवेच्या १९६३ च्या तुकडीतून ते सनदी सेवेत दाखल झाले. या सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी बँक ऑफ इंडियात अधिकारी म्हणून सेवा बजावली. आपल्या सेवा काळात मुंबईचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त या पदाबरोबरच अर्थ व कंपनीसंबंधित खात्यात जबाबदारीची अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने भारतीय क्रिकेट नियमन मंडळाच्या निवडणुका घेण्यासाठी त्यांची नेमणूक झाली होती. इलेक्ट्रॉन्स शििपग व्यवस्थापकीय संचालकपदी अरोरा मुंबई : कॅप्टन दीपक अरोरा यांना पदोन्नती देत इलेक्ट्रॉन्स शििपग प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती केल्याचे घोषित केले आहे. अरोरा गेल्या चार वर्षांपासून इलेक्ट्रॉन्स ग्रुपमध्ये कार्यरत असून आपल्या कार्यकाळात त्यांनी इलेक्ट्रॉन्समध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. कॅप्टन अरोरा थेट इलेक्ट्रान्स ग्रुपच्या समूह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उत्तरदायी असतील. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया नोंदवताना अरोरा म्हणाले, ‘‘भारतीय शििपग उद्योगामध्ये जागतिक मानांकने आणण्यासाठी इलेक्ट्रॉन्सने सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि भविष्यातही त्यांचे हे प्रयत्न चालूच राहणार आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन्सच्या शििपग उपक्रमांना जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्नही आम्ही करत राहू. आगामी वर्षांतले इलेक्ट्रॉन्स ग्रुपचे भवितव्य उज्ज्वल आहे याबाबत आम्ही अत्यंत सकारात्मक आहोत.’’

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email