Pages

Follow by Email

Monday, 6 June 2016

देशाचे पहिले मिस्टर युनिव्हर्स कालवश


कोलकाता : कोलकातामधील राहत्या घरी वृद्धापकाळाने देशाचे पहिले मिस्टर युनिव्हर्स आणि प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू मनोहर एच यांचे निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असे कुटुंब आहे.मनोहर एच यांना १९५२ मध्ये भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स बनण्याचा मान मिळाला. मिस्टर युनिव्हर्स बनल्यानंतर पश्चिम बंगालच नव्हे तर देशभरात त्यांची ओळख निर्माण झाली. मागील काही
दिवसांपासून मनोहर आजारी होते. गेल्या १०-१५ दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केला होता. अखेर रविवारी सकाळी मनोहर यांनी ३ वाजून ५० मिनिटांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती मनोहर यांचे पुत्र खोकन एच यांनी दिली. मनोहर यांचा एक मुलगा तरुणांना बॉडीबिल्डिंगचे धडे देण्यासाठी फिटनेस जीम चालवतो. उत्तम जेवण आणि दररोज व्यायाम हा मनोहर एच यांच्या आरोग्यदायी जीवनाचा मंत्र होता, असेही खोकन यांनी सांगितले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email