Pages

Follow by Email

Wednesday, 8 June 2016

अमेरिकेकडून प्राचीन भारतीय ठेवा परत


अमेरिकेने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या समारंभात भारताला 200 पेक्षा अधिक सांस्कृतिक कलाकृती परत केल्या. या कलाकृतींची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास 10 कोटी डॉलर्स आहे. काही लोकांसाठी या कलाकृर्तींची किंमत चलनाच्या रुपात असू शकते, परंतु आमच्यासाठी हे याहून अधिक आहे. हे आमच्या संस्कृती आणि वारशाचा हिस्सा असल्याचे मोदींनी यावेळी उद्गार
काढले.अमेरिकेकडून परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये धार्मिक मूर्त्यांचा समावेश आहे. यातील अनेक मूर्त्या 2000 वर्षांहूनही अधिक जुन्या आहेत. त्यांना भारताच्या सर्वाधिक संपन्न स्थळांवरून लुटण्यात आले होते. यातील एक मूर्ती संत माणिककविचावकर यांची आहे, जी चोल काळातील तमिळ कवी होते. या मूर्तीला चेन्नईच्या सिवान मंदिरातून चोरण्यात आले होते.

याचबराब्sार यात भगवान गणेश यांची मूर्ती आहे, जी 1000 वर्षे जूनी आहे. भारताचा संपन्न इतिहास आणि सुंदर संस्कृती दर्शविणाऱया कलाकृती आपल्या घरी परतण्याचा प्रवास सुरू करत आहेत. या वस्तू स्वदेशी परत देणे भारताच्या संस्कृतीप्रति आमच्याकडून सन्मानजनक आणि दोन्ही देशांमधील संबंधांप्रति आमच्या प्रशंसेचे प्रतीक बनेल असे अमेरिकन ऍटर्नी जनरल लोरेटा ई मिंच यांनी सांगितले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email