Pages

Follow by Email

Thursday, 26 May 2016

न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘हायवे’ उत्कृष्ट

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अरभाट फिल्म्स निर्मित ‘हायवे’ या मराठी चित्रपटाला १६ व्या न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट  आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. इंडो अमेरिकन आर्ट्स कौन्सिलतर्फे ७ ते १४ मे या कालावधीत न्यूयॉर्क येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण चाळीस चित्रपट सहभागी झाले होते.
भारतीय व अमेरिकन चित्रपटसृष्टीतील तेरा जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. हे दोन्ही पुरस्कार सईद मिर्झा व सय्यद अकबरुद्दीन आणि सलमान रश्दी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. वळू, विहीर आणि देऊळ या चित्रपटांनंतर जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेला दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा हा चौथा चित्रपट आहे

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email