Pages

Follow by Email

Friday, 27 May 2016

"बी कॉम्पिटिशन'मध्ये ऋषी नायर विजयी"


वॉशिंग्टन - "नॅशनल जिऑग्राफिक बी कॉम्पिटिशन‘मध्ये भारतीय वंशाचा अमेरिकन विद्यार्थी ऋषी नायर (वय 12) हा विजयी ठरला. या स्पर्धेच्या तीनही टप्प्यांत त्याचे वर्चस्व दिसून आले. फ्लोरिडा येथे राहणारा ऋषी सहाव्या इयत्तेत शिकत आहे. "नॅशनल जिऑग्राफिक‘च्या मुख्य कार्यालयात ही 28 वी स्पर्धा घेण्यात आली. पारितोषिकाच्या स्वरूपात त्याला 50 हजार डॉलरची महाविद्यालयीन शिष्यवृत्ती मिळणार असून नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीचे कायमचे सदस्यत्व मिळणार आहे. सलग पाच वर्षांपासून भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत आहेत. ऋषीचे आई-वडील मूळचे केरळचे आहेत.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email