Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

मालदिवच्या माजी अध्यक्षांना राजकीय निर्वासित दर्जा

लंडन - मालदिवचे माजी अध्यक्ष महंमद नशीद यांना ब्रिटनने राजकीय निर्वासित दर्जा मंगळवारी दिला. दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून नशीद यांना 13 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेची झोड उठली होती. नशीद हे "मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टी‘ (एमडीपी) पक्षाचे नेते व मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय
मिळाला असून राजकीय निर्वासिताचा दर्जा देण्यात आला आहे, असे त्यांचे वकील हसन लतिफ यांनी सांगितले. मालदिवमध्ये 2008 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पहिले अध्यक्ष आहेत.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email