Pages

Follow by Email

Friday, 27 May 2016

मेसी, बोल्ट, जोकोविचच्या पुढे कोहली

मुंबई : भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीनं आत्तापर्यंतचे बॅटिंगचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आता कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

जागतिक खेळाडूंमध्ये कोहली हा तिसरा सगळ्यात जास्त मार्केटेबल खेळाडू आहे. या यादीमध्ये कोहलीनं उसेन बोल्ट,
मेसी आणि जोकोविचला मागे टाकलं आहे. स्पोर्ट्स प्रो या मासिकानं ही यादी प्रसिद्ध केली आहे. स्पोर्ट्स प्रो हे मासिक खेळाच्या व्यवसायाचा रिसर्च करतं. या रिसर्चमध्ये खेळाडूची व्हॅल्यू फॉर मनी, वय, मार्केट, करिझमा या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता.
या यादीमध्ये एनबीएचा खेळाडू स्टिफन करी आणि पॉल पोग्बा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email