Pages

Follow by Email

Monday, 16 May 2016

अंतराळातील धुलीकणांमधून पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास

कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वातावरणातील वरच्या स्तरामध्ये सध्या जितके ऑक्सिजनचे प्रमाण आहे जवळ जवळ तितकेच प्रमाण अस्तित्वात होते. अंतराळातील धुलीकणांचा म्हणजेच मायक्रोमीटियोराईटस्चा वापर करून संशोधकांनी 270 कोटी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीच्या वातावरणाबाबत हे संशोधन केले आहे. आजही या स्तरात ऑक्सिजनचे प्रमाण तितकेच आहे हे विशेष!   मिथेनच्या एका पातळ स्तराने ऑक्सिजनच्या वरच्या स्तराला ऑक्सिजनरहीत स्तरापासून वेगळे केले आहे.
मोनाश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियन सिंक्रोटोन आणि इम्पिरियल कॉलेज लंडनमधील संशोधकांनी ऑस्ट्रेलियात एका जीवाश्म खडकामधून ही अंतराळ धुळीचे अवशेष बाजूला काढून संशोधन केले आहे. मोनाश युनिव्हर्सिटीचे अँड्र्यू टोमकिन्स यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, अत्याधुनिक साधनांचा वापर करून याबाबतचे संशोधन केले. बहुतांश मायक्रोमीटियोराईटस् हे वरच्या स्तरात आयर्न ऑक्साईड या खनिजात रूपांतरित झाले होते. त्यामधून अनुमानापेक्षा अधिक ऑक्सिजन होता असे दिसून आले. यानिमित्ताने प्रथमच प्राचीन काळातील पृथ्वीच्या वरच्या स्तरातील वातावरणाचा रासायनिक नमुना घेण्याचे तंत्र मिळवण्यात आले.

No comments:

Post a comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email