Pages

Follow by Email

Wednesday, 25 May 2016

आता बॅक्टेरियापासून कृत्रिम पाऊस पडणार


 तसे पाहिल्यास बॅक्टेरियांचा संबंध आजार आणि पचनासंबंधीच्या विकारांशी जोडला जातो. मात्र, आता हेच बॅक्टेरिया हवामानासंबंधीच्या कामातही महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. या मायक्रोब्सच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याची पद्धत शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

पावसाने ओढ दिल्याने भारतातील महाराष्ट्रासह अनेक राज्ये दुष्काळ आणि वाढत्या तापमानाने होरपळून निघत आहेत. शास्त्रज्ञांचे हे नवे संशोधन भविष्यात दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरू शकते. संयुक्त अरब अमिरातमध्ये तर यास एक मोठा प्रकल्प म्हणून पाहण्यात येत आहे. बॅक्टेरियाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्यासंबंधीचे हे संशोधन जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर पॉलिमर रिसर्च बायोइंजिनिअर प्रो. तोबिएस वेईनर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यास उपयुक्त ठरणार्या बॅक्टेरियांचा या पथकाने शोध लावला आहे. हे बॅक्टेरिया उंच आकाशातील ढगात आईस न्यूक्लिएशन करू शकतात. या प्रक्रियेनंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. मात्र, यासाठी आईस बॅक्टेरिया म्हणून ओळखण्यात येणार्या केवळ पी. सीरजेई यांचाच उपयोग होऊ शकतो
आता तर संयुक्त अरब अमिरातमध्ये ढग अडवून पाऊस पाडण्यासाठी उंच पर्वत उभारण्याच्या प्रकल्पाची तयारी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment


This free script provided by
JavaScript Kit

Follow by Email